वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध! लाडक्या बहिणींना 3500, घरगुती वीज मोफत; पाहा नेमकं काय आहे जाहीरनाम्यात
थोडक्यात
प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.
वंचित बहुजन आघाडीने आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरक्षितता देण्याचे वचन दिले आहे.
सरकार आल्यास महिलांना ३५०० रुपयांचे मासिक वेतन देण्याचा आणि शेतमाल हमीभाव कायदा करण्याचा प्रस्ताव वंचितने जाहीर केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. सर्वांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. यातच आज प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यात अनेक घोषणा करत वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी मतदारांना आश्वासंने दिले आहेत.
या जाहीरनाम्यात वंचित बहुजन आघाडीकडून आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरक्षितता देण्यात येणार असल्याचं म्हंटलं आहे. तर सरकार आल्यास महिलांना ३५०० रुपयांच मासिक वेतन देण्यात येईल, त्याचबरोबर शेतमाल हमीभाव कायदा करणार असल्याचं देखील वंचितने आपल्या जाहिरनाम्यात म्हंटलं आहे.