देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर ते मंत्री, पाहा मंगलप्रभात लोढा यांचा प्रवास

सलग सहा वेळा विधानसभेवर निवडून गेलेले मंगलप्रभात लोढा यांना भाजपने कॅबिनेट मंत्रिपद दिलं...देशातील सर्वात श्रीमंत बांधकाम व्यावसायिकाला मंत्री केलं...
Published by :
Team Lokshahi

सलग सहा वेळा विधानसभेवर निवडून गेलेले मंगलप्रभात लोढा यांना भाजपने कॅबिनेट मंत्रिपद दिलं...देशातील सर्वात श्रीमंत बांधकाम व्यावसायिकाला मंत्री केलं... त्यांना मंत्रिमंडळात घेण्यामागे भाजपचे लक्ष मुंबई महानगरपालिकाच आहे... आता मुंबई महापालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीत ते करिश्मा करुन दाखवणार का?, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे

मंगलप्रभात लोढा यांनी राजस्थानात एलएलबीचं शिक्षण घेतले. त्यानंतर वकिली सुरू केली. परंतु न्यायालयात वडील न्यायाधीश असल्याने त्यांनी वकिली सोडत थेट मुंबईत गाठली. याठिकाणी एका खासगी रिअल इस्टेटमध्ये नोकरी केली. ४ वर्ष फर्ममध्ये काम केल्यानंतर बिल्डिंगला लागणारं मटेरिअल पुरवण्याचं काम त्यांनी केले. १९८२ मध्ये एका मित्राच्या मदतीने नालासोपारा इथे जमीन खरेदीविक्रीचा व्यवसाय सुरू केला आणि याच व्यवसायात त्यांनी जम बसवला.

कसा आहे जीवन प्रवास

  • राजस्थानात एलएलबीचं शिक्षणानंतर वकिली सुरू केली

  • न्यायालयात वडील न्यायाधीश असल्यानं वकिली सोडत मुंबईत गाठली

  • 1982 मध्ये नालासोपारात जमीन खरेदीविक्रीच्या व्यवसायास सुरुवात

  • अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून भाजपापर्यंत राजकीय प्रवास

  • 1995 मध्ये मलबार हिलमधून तत्कालीन मंत्री देसाईंना हरवून जायंट किलर

  • मुंबई, पुणे, हैद्राबादप्रमाणे लंडनमध्ये लोढा ग्रुपचे प्रकल्प

राज्यातील सत्ता मिळवल्यानंतर भाजपचं लक्ष आता मुंबई महानगरपालिकेकडे लागलं आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप प्रयत्न करत सुरु केला आहे. त्यासाठी आता मंगलप्रभात लोढा यांना मंत्री केले आहे. ते मुंबई भाजपचे अध्यक्ष आहे. दक्षिण मुंबईत लोढा यांचे वर्चस्व आहे. त्यांच्या माध्यमातून शिवसेनेची सत्ता असलेली महानगरपालिका भाजप मिळवेल का? हे येणारा काळच सांगेल...

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com