Malegaon पोलिसांची मोठी कारवाई, नशेचा व्यापार करणाऱ्या सुत्रधार ताब्यात
मालेगाव, धुळ्यासह इतर भागांमध्ये चोरट्या मार्गाने ड्रग्ज विक्री करणाऱ्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवाळल्या आहेत. रॅकेट चालविणाऱ्या जुबेर युसूफ शेखला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या नशेचे मुंबईनंतर गुजरात कनेक्शन देखील उघड झाले होते. सुरत शहरातील लहान मुलांच्या मदतीने विविध मेडिकलमधून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कोडीन खोकल्याच्या बाटल्यांची खरेदी करायची.
औषधाचा पुरेसा साठा झाली की मालेगाव, धुळ्यासह इतर भागांमध्ये चोरट्या मार्गाने विक्री करनारे रॅकेट चालविणाऱ्या संशयित जुबेर युसूफ शेख ऊर्फ आर. के. (24) याच्या मालेगावच्या विशेष पोलीस पथकाने सुरतमधून मुसक्या आवळल्या. मालेगाव गुजरात व महाराष्ट्राच्या विविध भागात नशेच्या औषध तस्करीचे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल असल्याचे सांगितले जात आहे. मालेगावात कूत्ता गोळी, कोडीन खोकल्याची बॉटल अशा विविध पद्धतीने नशा केला जातो. या नशेचे मुंबई नंतर गुजरात कनेक्शन देखील उघड झाले होते. या प्रकरणात मालेगावच्या पोलिसांची ही मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.