Mahesh Shinde : पवारांना मुलीला मुख्यमंत्री करायचं आहे; आमदार महेश शिंदेंची पवारांवर टीका

आमदार महेश शिंदे यांनी सुप्रिया सुळे यांच्यासह पवारांवर जोरदार टीका केली आहे. पवारांना मुलीला मुख्यमंत्री करायचं आहे असं महेश शिंदे यांनी म्हटलेलं आहे.
Published by :
Team Lokshahi

आमदार महेश शिंदे यांनी सुप्रिया सुळे यांच्यासह पवारांवर जोरदार टीका केली आहे. पवारांना मुलीला मुख्यमंत्री करायचं आहे असं महेश शिंदे यांनी म्हटलेलं आहे. 32 कोटींची वांगी काढणारी मुलगी मुख्यमंत्री झाली तर सगळे हॅलिकॉप्टरमधून पळतील, साताऱ्यातील सभेत आमदार महेश शिंदे यांनी खोचक टोला लगावला आहे. तर आपल्याला जनतेशी नाळ असलेल्यांना पुढे घेऊन जायचं आहे असं देखील महेश शिंदे यांनी म्हटलं आहे.

यापार्श्वभुमीवर महेश शिंदे म्हणाले, माझी मुलगी माझी जबाबदारी, हम दो हमारे हो आता मुलगी मुख्यमंत्री करायची आहे. तीन एकर जमीनीत 32 कोटींची वांगी काढणारी ही मुलगी महाराष्ट्राची जर मुख्यमंत्री झाली सगळे हॅलिकॉप्टरमधून पळतील, आपल्याला जनतेशी नाळ असलेल्यांना पुढे घेऊन जायची आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com