Mahayuti | रायगड जिल्ह्यात महायुतीमधील वाद चिघळणार? | Marathi News

रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीमधील वाद चिघळण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या कर्जतच्या जागेवर राष्ट्रवादीचा डोळा पाहायला मिळत आहे.
Published by :
Team Lokshahi

रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीमधील वाद चिघळण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या कर्जतच्या जागेवर राष्ट्रवादीचा डोळा पाहायला मिळत आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कर्जतच्या जागे बाबत संकेत दिले आहेत. कर्जतमधून राष्ट्रवादीचे सुधाकर घोरे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत.

यापार्श्वभूमीवर आता कर्जतची जागा महायुतीमध्ये नेमकी कोणाला मिळणार याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे आणि जर ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला लढवायची असेल तर त्याच्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नाराजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यात आता पुढे काय होणार याकडे लक्ष लागलेलं आहे मात्र यामुळे महायुतीमधील वाद चिघळण्याची शक्यता वर्तावली जात आहे.

यावर सुनिल तटकरे म्हणाले की, अलिबाग, पेन, दापोली, गुहागर, महाड यासर्व ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुर्ण ताकदीने महायुतीचं काम करेल. कर्जतचा प्रश्न राहिला तर त्याठिकाणी सुधाकर घोरे त्याठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मतदार संघामध्ये शिवसेनेचे सुद्धा काही नेते त्याठिकाणी इच्छूक आहेत. याचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून मी आम्ही मिळून घेऊ असं सुनील तटकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com