राज्यात झिकाचा धोका वाढल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 80वर गेल्याची माहिती मिळत आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 73 रुग्ण आढळले आहेत. इतर जिल्ह्यांत झिकाच्या रुग्णसंख्येत फारशी वाढ नोंदविण्यात आलेली नाही. यात गर्भवती महिलांना झिकाची सर्वाधिक लागण झाल्याची माहिती मिळत असून पालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झालं आहे.