व्हिडिओ
Maharashtra Vidhasabha Candidate : ४ हजार १३६ उमेदवारांपैकी 29% गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत ४१३६ उमेदवार, १९% उमेदवारांवर गंभीर गुन्हे, २९% उमेदवारांवर विविध गुन्हे दाखल. सर्वोच्च न्यायालय व निवडणूक आयोगाने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांबाबत राजकीय पक्षांना दिले आदेश.
आपले राजकीय भवितव्य आजमावण्यासाठी विधानसभेच्या मैदानात उतरलेल्या सुमारे चार हजार उमेदवारांपैकी तब्बल १९ टक्के उमेदवारांवर बलात्कार, महिलांवरील अत्याचार, हत्या, हत्येचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांची तर २९ टक्के उमेदवारांवर विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीतील ३८ टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत पक्षांनी निवडणुकीसाठी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना उमेदवारी देतांना अन्य व्यक्तींना उमेदवारी का दिली नाही याचे स्पष्टीकरण देण्याचे तसेच उमेदवारांवरील गुन्ह्यांचा तपशील जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालय तसेच निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना दिले आहेत.