Maharashtra Vidhansbaha Exit Poll : यंदाच्या निवडणुकीत लाडकी बहिण योजना गेम चेंजर ठरणार का ?

महायुतीने ज्यावेळेस प्रचाराला सुरुवात केली त्यावेळेस सर्वात मोठा अजेंडा होता लाडकी बहिण योजना. त्यामुळे आज झालेल्या मतदानाला फळाला येणार का? यावर गणेश खणकर म्हणाले
Published by :
Team Lokshahi

महायुतीने ज्यावेळेस प्रचाराला सुरुवात केली त्यावेळेस सर्वात मोठा अजेंडा होता लाडकी बहिण योजना. त्यामुळे आज झालेल्या मतदानाला फळाला येणार का? यावर गणेश खणकर म्हणाले की, नक्कीच कारण लाडकी बहिण योजना आल्यानंतर ज्याप्रकारे विरोधी पक्षाकडून याची खिल्ली उडवण्यात आली.

ही योजना रद्द करावी म्हणून विरोधी पक्ष कोर्टापर्यंत गेले आणि त्यामुळे आता ही योजना खरचं गेम चेंजर ठरु शकते. ज्याप्रकारै सुरुवातीला विरोधी पक्षाने या योजनेला नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या मात्र अखेर त्यांनी देखील आता ३००० हजार रुपये देणार असं ते म्हणू लागले आहेत म्हणजे नक्कीच या योजनेला महिलांनी उचलून धरलेलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com