Maharashtra Vidhan Sabha Election Ambadas Danve : पुण्यात रक्कम जप्त ; दानवेंची टीका

पुण्यात खाजगी वाहनातून मोठी रक्कम जप्त करण्यात आलेली आहे. खेड शिवापूरात 5 कोटींची रक्कम पोलिसांना सापडलेली आहे. याचपार्श्वभूमीवर अंबादास दानवे ट्वीट करत म्हणाले आहेत की,
Published by :
Team Lokshahi

पुण्यात खाजगी वाहनातून मोठी रक्कम जप्त करण्यात आलेली आहे. खेड शिवापूरात 5 कोटींची रक्कम पोलिसांना सापडलेली आहे. कॅश पकडलेली गाडी ही सांगोल्यातील अमोल नलावडे यांच्या नावावर असल्याची माहिती सुत्रांकडून मिळालेली आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलेलं आहे. विधानसभेच्या अनुषंगाने नाकाबंदीच्या वेळेस एका गाडीमध्ये ही रक्कम सापडलेली आहे.

तर गाडी मालक अमोल नलावडे यांनी काही दिवसांपुर्वी गाडी विकली होती. मात्र गाडीत सापडलेल्या पैशांसोबत त्यांचा काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण गाडी मालक अमोल नलावडे यांनी दिलं आहे. त्यामुळे ही गाडी नेमकी कोणाची, पैसे कोणाचे आणि ही गाडी त्यांनी नेमकी कोणाला विकली होती? असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत. तसेच या प्रकरणी अंबादास दानवे यांनी ट्वीट केलं आहे.

याचपार्श्वभूमीवर अंबादास दानवे ट्वीट करत म्हणाले आहेत की, "खेड शिवापूर प्रकरणी पत्रकारांच्या प्रश्नांना बगल देऊन पळणारे अधिकारी खरं तर ऑलिम्पिकमध्ये धावायला हवेत, ते देशासाठी पदक नक्की आणतील! केवढा तो वेग!! यावरून हे स्पष्ट आहे की ही रक्कम कुठून कुठे जात होती आणि सत्ताधाऱ्यांच्या ओझ्याखाली कोण दबले आहेत. साधा पाकिटमार धरला की गावभर आपल्या कौतुकाची दवंडी देणारे पोलिस खेड शिवापूर सारख्या प्रकरणांत मूग गिळून गप्प बसणे, हा आता आचारसंहितेचा अलिखित नियमच आहे".

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com