व्हिडिओ
Video : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांचा उद्धव ठाकरेंशी व्हिडिओने संवाद
वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. आम्हाला समजून घ्या. आज आमची भूमिका चुकीची वाटत असेल तरी उद्या तुम्हाला समजेल. आम्हाला बंडखोर म्हणू नका.
मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसैनिकांसाठी भाविनक आवाहन केले. त्या आवाहनानंतर वर्षा बंगला व मातोश्री निवासस्थानाबाहेर गर्दी झाली. मुख्यमंत्र्यांच्या या भाषणावर खरमरीत पत्र औरंगाबादचे आमदार संजय शिरसाठ यांनी आता व्हिडिओच्या माध्यमातून संपर्क साधला.
वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात पण आमच्यासाठी तर सहाव्या माळ्याचाही प्रश्न आता नाही कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही.
व्हिडिओत आमदार संजय शिरसाठ यांनी आम्हाला बंडखोर म्हणू नका, अशी विनंती केली आहे. येत्या काही दिवासांत तुम्हाला आमची भूमिका कळेल.