Maharashtra : सरकारी कर्मचारी 29 ऑगस्टपासून बेमुदत संपावर

सरकारी कर्मचारी 29 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारी-निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे.
Published by :
Team Lokshahi

सरकारी कर्मचारी 29 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारी-निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे. जुनी पेन्शन लागू करा अशी मागणी केली जात आहे. याआधी सुद्धा या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता त्याचा फटका बसलेला पाहायला मिळालेला होता त्यामुळे शासकीय काम थांबलेलं होत. तर त्यांना काही आश्वासन देण्यात आलेली होती त्यावेळेस त्यांनी संप मागे घेतला होता मात्र त्यांच्या मागण्या पुर्ण केल्या गेल्या नाही.

जुनी पेन्शन लागू करा अशी मागणी ते करतं आहेत. पेन्शन विषयीचा निर्णय झाला असला तरी त्याच्यामध्ये 2005 पुर्वीचे जे रुजू झालेले कर्मचारी आहेत त्यांना पेन्शनचा लाभ मिळणार आहे, मात्र 2005 नंतर जे कर्मचारी रुजू झालेत त्यांचं काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याची मागणी पूर्ण झालेली नसल्यामुळे 17 लाख कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com