व्हिडिओ
Maharashtra : महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून गिफ्ट; जालना-जळगाव नवीन रेल्वे मार्गाला केंद्राची मंजुरी
महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून आणखी एक गिफ्ट देण्यात आलं आहे. जालना ते जळगाव नवीन रेल्वे मार्गाला केंद्राने अखेर मंजुरी दिली आहे.
महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून आणखी एक गिफ्ट देण्यात आलं आहे. जालना ते जळगाव नवीन रेल्वे मार्गाला केंद्राने अखेर मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत केंद्राचे आभार मानले आहेत, त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणि रेल्वे मंत्र्यांचे देखील त्यांनी आभार मानले आहेत.
तर नव्या 174 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गासाठी तब्बल 7 हजार 105 कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आलेला आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासोबत आता जोडला जाणार आहे. तर UNESCO कडून जागतिक वारसा म्हणून नोंद असणाऱ्या अजिंठा लेण्यांसोबत आता जोडले जाणार आहे.