CM मला तुमच्याशी बोलायचंय |राज्यातील वाढत्या गुन्हेगारीला कोण जबाबदार ?
राज्यात कायद्याचा धाक आणि पोलिसांचा वचक राहिलाय का हा प्रश्न उपस्थित होतोय. माध्यमात काम करत असताना एक दिवस असा जात नाहीये गुन्हेगारीच्या बातम्या येत नाही. सगळीकडे खून, दरोडे, चोरी, मारामाऱ्या, लूटमार हे सुरूय. नाशिकमध्ये एका महिन्यात 7 जणांची हत्या झालीय, रायगडमध्ये एका आईने पोटच्या 6 मुलांना विहिरीत फेकून देत हत्या केली. औरंगाबाद मधील एका महाविद्यालयाजवळ मुलीला 300 मीटर ओढत नेत गळा चिरून खून करण्यात आला. तर एका मुलाने 700 रुपयांसाठी आई वडिलांचा खून केला. या महाराष्ट्रात चाललंय तरी काय. दिवसाढवळ्या गंभीर गुन्हे घडत असताना गृह विभाग झोपलाय का? गुन्हे घडल्यावर कारवाई करणे हे पोलिसांचे काम आहेच, पण गुन्हे घडू नये यासाठी दक्ष राहणे हे पोलिसांचे काम नव्हे का? कि पोलिसांच्या खाकिला राजकारणाची झालर लागलीय ? राज्यातील जनतेची सुरक्षा वेशीवर टांगली गेलीय का? असे अनेक प्रश्न उपस्थित होताय. हेच प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारुयात आणि राज्यातील जनतेचं मत काय आहे हे देखील जाणून घेऊयात. पाहुयात CM मला तुमच्याशी बोलायचं