Mahanand Dairy: 'महानंद' 5 वर्षांसाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे

‘महानंद’ या सहकारी दूध क्षेत्रातील शिखर संस्थेच्या बळकटीकरणासाठी संस्थेचे व्यवस्थापन पाच वर्षांसाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे सोपविण्यास राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली.

‘महानंद’ या सहकारी दूध क्षेत्रातील शिखर संस्थेच्या बळकटीकरणासाठी संस्थेचे व्यवस्थापन पाच वर्षांसाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे सोपविण्यास राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली. संस्था तोट्यात गेल्याने ती व्यावसायिक तत्वावर चालवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा विभागाचा दावा आहे. पुनर्रचनेनंतरही महानंद ब्रँडचे नाव कायम राहणार आहे.

प्रकल्प इतर राज्यात कोठेही गेलेले नाही. महानंदाच्या व्यावसायिक विकासासाठी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास सचिव यांच्या अध्यक्षतेखालील ह्यसुकाणू समितीह असणार आहे. पुढच्या ५ वर्षात महानंद ८४ कोटी नफ्यात येईल, असे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी पत्रकारांना सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com