Wardha : रक्षाबंधनानिमित्त मगन संग्रहालयाचा अनोखा उपक्रम
महात्मा गांधी यांच्या विचाराने कार्य करणाऱ्या मगन संग्रहालयाने नवा उपक्रम राबवून अल्लीपूर येथील इंदिरा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक राख्या बनवल्या आहेत. शाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेऊन ह्या राख्या विद्यार्थ्यांना बांधल्या जाणार असून राखीचा सण झाल्यानंतर विद्यार्थी ह्या राख्या झाडाला बांधतील व राख्या ह्या जमिनीत रोवुन त्यापासून झाडाची निर्मिती होणार आहे.
सध्या मार्केटमध्ये प्लास्टिकच्या राख्या मिळत असून त्या पर्यावरणाची हानी करतात. देशी बीज संवर्धनासह पर्यावरण रक्षणासाठी मगन संग्रहालयाने घेतलेला हा उपक्रम अभिनव आहे. मगन संग्रहालय समितीतर्फे जिल्ह्यातील बारा शाळांमध्ये असा उपक्रम नेहमीच राबवला जातो. इंदिरा गांधी विद्यालयात राबवण्यात आलेल्या या पर्यावरण पूरक राख्या बनवण्याच्या उपक्रमात शाळेतील विद्यार्थिनी तसेच शिक्षिकेंनीही सहभाग घेतला.