व्हिडिओ
ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची प्रकृती अत्यवस्थ; नाशिकच्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरु
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. पहाटेच्या सुमारास पिचड यांना ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती आहे.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. पहाटेच्या सुमारास पिचड यांना ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राजूर येथील राहत्या घरी ८३ वर्षीय पिचड यांना ब्रेन स्ट्रोक आला. त्यानंतर नाशिकच्या ९ पल्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.