Laxman Hake : 'ओबीसींच्या हक्कांचं संरक्षण झालंच पाहिजे'; ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सरकारला इशारा

ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी सरकारला इशारा दिला आहे. सगेसोयरेचा जीआर निघणार असेल तर शांत बसणार नाही असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.
Published by :
Team Lokshahi

ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी सरकारला इशारा दिला आहे. सगेसोयरेचा जीआर निघणार असेल तर शांत बसणार नाही असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले आहेत. 54 लाख नोंदी आहेत तर ओबीसी आरक्षणाला धक्का कसा नाही. महाराष्ट्र कोणाची मक्तेदारी नाही, तो 18 पगड जातींचा आहे. ओबीसींच्या हक्कांचं संरक्षण झालचं पाहिजे असं वक्तव्य लक्ष्मण हाकेंनी केलं आहे. तर 288 मतदारसंघात ओबीसीची ताकद दाखवून देऊ असं देखील लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.

याचपार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके म्हणाले, जरांगे पाटील म्हणाले होते 54 लाख नोंदी ओबीसीमधून केली आहे कुणबीकरणाद्वारे. 54 लाख नोंदी झाल्या असतील आणि सगेसोयरेच्या जीआरची तयारी चालू असेल ओबीसीने शांत बसाव असं त्यांना अपेक्षित आहे का? कसा धक्का लागत नाही सांगा म्हणजे ओबीसीला कळत नाही असं तुम्ही समजून चालेले आहात. महाराष्ट्र कोणाची मक्तेदारी नाही, तो 18 पगड जातींचा महाराष्ट्र आहे. हे आम्ही प्रत्येक विधानसभा मतदारसभेत दाखवून देऊ सरकारला, असा इशारा लक्ष्मण हाकेंनी सरकारला दिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com