Latur : लातूर जहिराबाद महामार्ग काम निकृष्ट दर्जाचे
जहिराबाद महामार्गाचे काम गुत्तेदार आणि अभियंता यांनी संगनमताने निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप करत लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील लोदगा गावचे सरपंच पांडुरंग गोमारे गेल्या सहा दिवसा पासून आमरण उपोषणाला बसले आहेत. लातूर-जहिराबाद महामार्गावर मोठ-मोठ्या भेगा पडल्या असून वाहन धारकांना अपघाताला समोर जावे लागत आहे. तर यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गुत्तेदाराने नियमानुसार कोणतेच काम केले नसून रत्यावरील पुलाचे काम अर्धवट केले आहेत. वृक्ष लागवड, संरक्षक कठडे, सुशोभीकरण आणि झेब्रा क्रॉसिंग असे अनेक काम अर्धवट केले आहे. त्यामळे अपघात होऊन अनेकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित गुत्तेदार आणि अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा. जो पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होणार नाही तो पर्यंत आमरण उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा सरपंचांनी घेतला आहे.