Kolhapur: पुणे राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था, किणी टोल नाक्यावर काँग्रेसचे आंदोलन

पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापुर ते पुणे यादरम्यान महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.
Published by :
Team Lokshahi

पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापुर ते पुणे यादरम्यान महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. या महामार्गाची दुरावस्था झालेली आहे. यामुळे टोल का द्यायचा असा प्रश्न काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केलेला आहे. रस्ताच नाही तर त्या जागेवर टोल का द्यायचा असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे आणि याच करता आज काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे.

यामुळे किणी टोल नाक्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे. तर मोठ्या संख्येने या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनासाठी जमलेले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com