व्हिडिओ
Kamlesh Sutar: सोशल मीडियावर विषारी प्रचारालाही वाव
बातमी म्हणजे फक्त माहिती नसून लोकांचे प्रश्न पत्रकारितेच्या माध्यमातून मांडले पाहिजेत असं मत लोकशाहीचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांनी मांडलं आहे.
बातमी म्हणजे फक्त माहिती नसून लोकांचे प्रश्न पत्रकारितेच्या माध्यमातून मांडले पाहिजेत असं मत लोकशाहीचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांनी मांडलं आहे. पुण्यात इंडी जनरल मीडियानं आयोजित केलेल्या परिसंवादात त्यांनी मराठी माध्यमांबाबत आपली भूमिका मांडली. प्रत्येक पत्रकारानं आणि संपादकानं प्रत्येक घटनेबाबत एक भूमिका घेतलीच पाहिजे असं मत त्यांनी मांडलं आहे. टीव्ही मीडियाचा इम्पॅक्ट मोठा आहे आणि सोशल मीडियामुळं त्यावर कोणताही फरक पडलेला नाही असंही त्यांनी सांगितलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला वाव असला तरी सोशल मीडियावर विषारी प्रचारालाही व्यासपीठ मिळालंय हे त्यांनी आवर्जून सांगितलं आहे..