Kalyan Station : कल्याण स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी ; लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द

बदलापूर लैंगिक अत्याचारामुळे नागरिक आता चांगलेच संतापलेले आहेत. संतपलेल्या नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर रेल्वेरोको आंदोलन ही करण्यात आलेलं आहे. यामुळे कल्याण रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची आता गर्दी झालेली आहे.
Published by :
Team Lokshahi

बदलापूर लैंगिक अत्याचारामुळे नागरिक आता चांगलेच संतापलेले आहेत. संतपलेल्या नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर रेल्वेरोको आंदोलन ही करण्यात आलेलं आहे. यामुळे कल्याण रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची आता गर्दी झालेली आहे. याचपार्श्वभूमीवर लांब जाण्याऱ्या गाड्या देखील बंद करण्यात आल्या आहेत.

काही गाड्या दिवा आणि पनवेल मार्गे नेण्यात आल्याचं कळतं आहे. गाड्या कमी वेगाने नेण्यात येत आहेत, तर या गाड्या कल्याणवरून ठाण्या मार्गे, ठाण्यावरून पनवेल मार्गे तर तिथून कर्जत अशा वळवण्यात आल्या आहेत. काही प्रवासी हे 2 ते 3 तासांनी थांबून गाड्यांची वाट पाहत आहेत. अशातच प्रवाशांना आता सुचना देण्यात आली आहे ज्या एक्सप्रेस गाड्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या आहे. बदलापूरमधील झालेल्या प्रकरणामुळे आता वाहतूकीत खोळंबण दिसत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com