jayantpatil | '...तर सर्व योजना बंद होतील', मोठ्या नेत्याचा खळबळजनक दावा
महायुतीच्या योजनांवर जयंत पाटील यांनी टीका केली आहे. महायुतीच्या योजनांमुळे राज्यावर 10 लाख कोटींचं कर्ज आहे. सरकारकडे योजना नसताना योजना जाहीर करतात. महायुती पुन्हा सत्तेत आल्यास सर्व योजना बंद होतील अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिलेली आहे.
यावर जयंत पाटील म्हणाले की, केलेल्या योजनांवर पैसे नाही म्हणून सरकारने रिजर्व बॅंक ऑफ इंडियाला एक पत्र दिलं आहे. महाराष्ट्र सरकारने हे पत्र देत विनंती केली आहे की, सव्वा लाख कोटी रुपयांच डिसेंबरपर्यंत खर्च करण्यासाठी पैसे द्या. 8 लाख कोटी रुपये सरकारवर कर्ज आहे तर त्यात अजून सव्वा लाख कोटी रुपये डिसेंबर अखेरपर्यंत मागितलेले आहेत.
या महाराष्ट्रात सत्तेतून बाहेर जाताना ही लोक 9-10 लाख कोटीपर्यंत पुढे घेऊन जायच्या तयारीत आहेत. जे लाडक नव्हत ते सगळ त्यांना लाडक वाटायला लागलं आहे. ते तुमच्यासाठी नाही तर लाडक्या खुर्चीसाठी चालू आहे. इलेक्शन झाल्यानंतर हे लोक या योजनांच काय करतील काय सांगू शकत नाही.