Jayant Patil : तुमच्यासमोर भाषण करायची इच्छा नाही; जयंत पाटील कार्यकर्त्यांवर संतापले

राष्ट्रवादी SPचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सभेदररम्यान कार्यकर्त्यांनी गोंधळ केल्याने जयंत पाटील कार्यक्रत्यांवर भडकले होते.
Published by :
shweta walge

राष्ट्रवादी SPचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सभेदररम्यान कार्यकर्त्यांनी गोंधळ केल्याने जयंत पाटील कार्यक्रत्यांवर भडकले आहेत. शिवस्वराज यात्रा जालना जिल्हा दौऱ्यावर असताना जालन्यातील भोकरदन येथे सभे दरम्यान काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय, त्यावर जयंत पाटील कार्यकर्त्यांवर चांगलेच संतापले. तुमच्यात काही शिस्त दिसत नाही. तुमच्यासमोर भाषण करायची इच्छा नाही, तुम्ही येथे दादागिरी करायला आलात का असा प्रश्न त्यांनी कार्यकर्त्यांसमोर उपस्थित केलाय आणि रावसाहेब दानवेंना मदत करायचा धंदा तुमचा सुरू आहे,असे बोलून जयंत पाटील कार्यकर्त्यांवर संतापलेय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com