Jammu And Kashmir | Election | जम्मू काश्मीर विधानसभेच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान | Marathi News
जम्मू काश्मीर विधानसभेच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान आहे, तर पहिल्या टप्प्यात 90 पैकी 24 जागांसाठी मतदान होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर पहिल्यांदा विधानसभा निवडणूक होत आहे. 10 वर्षांपूर्वी याठिकाणी भाजप आणि पीडीपीचं सराकर होतं त्याच्यानंतर सरकार बरखास्त करण्यात आलं. त्यानंतर सरकारनं कलम 370 हटवलेलं होत आणि तेव्हापासून याठिकाणी केंद्रशासित प्रदेश म्हणून जम्मू काश्मीर आणि लडाखचं विभाजन झाल्याचं पाहायला मिळालं होत.
त्यानंतर याठिकाणी विधानसभेची निवडणूक नव्हती, सरकार नव्हतं तर फक्त प्रशासकीय राज्य होतं, राज्यपाल तेथील सगळं पाहतं होते आणि असं असताना आता 10 वर्षानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यापार्श्वभूमीवर या निवडणूकीवर सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. तर 23 लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे विधानसभेची निवडणूक आता जम्मू-काश्मीरमध्ये होत असताना तेथील जनतेचा कौल नेमका कोणाला लागणार याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे.
याठिकाणी कॉंग्रेस देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलं आहे. तर दुसरीकडे भाजपसुद्धा येथे निवडणूकीच्या रिंगणात उतरलेलं आहे. तसेच जे छोटे पक्ष आहेत ते सुद्धा निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे आता जम्मू-काश्मीरची जनता कोणाला निवडून देणार आहे याकडे आता लक्ष लागलेलं आहे.