व्हिडिओ
Jalgoan | Rishi Panchami | ऋषिपंचमीनिमित्त पूजेसाठी महिलांची गर्दी | Marathi News
ऋषिपंचमीनिमित्त जळगाव जिल्ह्यामध्ये गणेश घाटासह विविध नद्यांवर महिलांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषिपंचमी साजरा केली जाते.
गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला ऋषिपंचमी हे व्रत केले जाते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे अंश मानले जाणाऱ्या गौतम, जमदग्नी, विश्वामित्र, अत्री, भारद्वाज, वशिष्ठ, कश्यप या ऋषींची पूजा केली जाते. ज्याने आपल्या घरात सुख समृद्धी प्राप्त होते.
ऋषिपंचमीनिमित्त जळगाव जिल्ह्यामध्ये गणेश घाटासह विविध नद्यांवर महिलांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. सात दगडांची पुजा करून सात ऋषिंची नाव घेत ही पुजा केली जाते. या ऋषिपंचमीच्या दिवशी महिला नदीवर स्नान करायला जातात आणि ऋषिंची पुजा करतात. तसेच आपल्यावरील आणि आपल्या परिवारावरील पिडा दूर होऊ यासाठी पार्थना करत हे व्रत करतात. अनेक दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी तसेच सुख शांती मिळवण्यासाठी हे व्रत केले जाते.