jalgaon Gold | Diwali Dhanteras 2024 : धनत्रयोदशीचा शुभमुहूर्त! दागिने खरेदीसाठी नागरिकांची झुंबड
सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. आज धनत्रयोदशी आहे धनत्रयोदशीच्या दिवशी थोडेफार का होईना सोने खरेदी करून त्याचं घरात पूजन केलं तर घरामध्ये बरकत असते अशी नागरिकांची भावना आहे. याच भावनेतून आज धनत्रयोदशी दिवशी देशातली सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफ बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळालं.
सकाळपासूनच आज सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी ही दिसून आली. ग्राहकांच्या गर्दीमुळे सुवर्णनगरी आज चांगलीच गजबजल्याच पाहायला मिळालं. गेल्या वर्षी सोन्याचे भाव हे 60 हजार रुपये पर्यंत होते हेच भाव आता यावर्षी 81 हजार 600 रूपये झाले असून यंदा सोन्याचे भाव हे पोहोचले आहे.तर चांदीचा भाव 1 लाख 1500 रूपये असून आज मुहूर्तावर सोना खरेदीसाठी ग्राहकांनी सराफ बाजारात गर्दी केल्याचे दिसून आलं.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सराफ व्यावसायिकांकडून ग्राहकांसाठी वेगवेगळ्या आकर्षकाच्या डिझाईन मध्ये सोन्याचे दागिने उपलब्ध करून देण्यात आले आहे तसेच लक्ष्मीपूजन लक्षात घेता चांदीची लक्ष्मी चांदीचा लक्ष्मीची शिक्के सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले असून हे खरेदी करण्याकडेही ग्राहकांचा मोठा कल दिसून येत आहे.
गेल्या वर्षापेक्षा दरवाढ झाल्याने गृहिणींच बजेट कोलमडले आहे मात्र थोडफार का होईना सोन खरेदी करण्यासाठी महिला ग्राहकांनी सोन्याच्या दुकानात मोठे गर्दी केल्याचा चित्र आज सुवर्ण पाहायला मिळाला. काही दिवसांनी लग्नसराई सुद्धा आहे त्यामुळे लग्नसरायसाठीच सोनं सुद्धा नागरिक आजच खरेदी करताना दिसून येत आहे.