व्हिडिओ
Chandrayaan 3: भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यासाठी सज्ज
भारताची चांद्रयान मोहीम अंतिम टप्प्यावर आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यास सज्ज आहे.
भारताची चांद्रयान मोहीम अंतिम टप्प्यावर आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यास सज्ज आहे. आज संध्याकाळी 06 वाजून 04 मिनिटांनी चांद्रयान दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. चांद्रयानाबाबत इस्त्रोने ट्वीट करत माहिती दिलीय. चांद्रयान- ३’ चंद्रावर उतरविण्याच्या प्रक्रियेत 15 मिनिटे गुंतागुंतीची असतील, असे ‘इस्रो’च्या अधिकाऱ्यांसह अनेक शास्त्रज्ञांचे मत आहे. ही सर्व प्रक्रिया स्वयंचलित आहे. जेव्हा लँडर त्याचे इंजिन योग्य वेळी आणि योग्य उंचीवर सुरू करते तेव्हा योग्य प्रमाणात इंधन वापर केला जातो. इस्रो’चे संकेतस्थळ, युट्यूब वाहिनी, फेसबुक पेजवर थेट प्रक्षेपण दाखविले जाणार असल्याचे ‘इस्रो’ने सांगितले. संध्याकाळी 5 वाजून 27 मिनिटांपासून हे थेट प्रक्षेपण सुरु होणार आहे.