One Nation One Electionवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने
एक देश एक निवडणूक यावर संजय राऊतांचा हल्लाबोल आहे. एक देश एक निवडणूकवरुन त्यांना नो इलेक्शन करायचं आहे असं राऊत म्हणतायेत. संविधानातील मार्गदर्शक तत्व बदलली जातात असं देखील राऊतांचं म्हणंण आहे. आधी महापालिका निवडणूका घेऊन दाखवा असं राऊत स्पष्टच करतायेत.
लोकसभा निवडणूका, राज्याच्या निवडणूका यासाठी एकत्र घ्यायाच्या नाहीत कारण ईव्हिएममध्ये यंत्रणेमुळे एकाच वेळेला निवडणूका जिंकायचे. एकदाच ईव्हिएम फीट करुन टाकायचं. त्याआधी महानगरपालिकाच्या निवडणूका घेऊन दाखवा एकत्र, राज्यांच्या निवडणूका घेऊन दाखवा एकत्र, वन नेशन, वन इलेक्शन हे लोकशाही विरोधी आहे. भविष्यात कदाचित नो इलेक्शन हा त्यांचा नारा असेल त्याची सुरुवात आहे. आज वन नेशन, वन इलेक्शन भविष्यात हा देशच राहणार नाही नो इलेक्शन, नो नेशन हे सुद्धा करु शकतात त्याची तयारी आहे. आम्ही सगळे इंडिया आघाडीचे लोक एकत्र बसून याच्यावरती चर्चा करु. भारतीय जनता पक्षाचं प्रत्येक पाऊल हे संविधानाला आव्हान देणारं आहे. घटनाकार आणि संविधानाचे निर्मात्याने ज्या तरतूदी करुन ठेवल्या आहेत त्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि मोदी त्या संविधानावरचं हल्ला करताना दिसतायेत असं संजय राऊत म्हणाले.