व्हिडिओ
Pune Drugs Case : ड्रग्जप्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ड्रग्ज तयार करणाऱ्या फॅक्टरी मालक भीमाजी साबळे यासह युवराज भुजबळ या दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने वाढवली.
ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ड्रग्ज तयार करणाऱ्या फॅक्टरी मालक भीमाजी साबळे यासह युवराज भुजबळ या दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने वाढवली. आरोपी युवराज भुजबळ आणि भिमाजी साबळे या दोघांनी मिळून पुण्याजवळील कुरकुंम या एमआयडीसीमध्ये ड्रग्जची फॅक्टरी सुरू केली होती. या दोघांनाही फॅक्टरी सुरू करण्यासाठी इंटरनॅशनल ड्रग्ज तस्कर संदीप धुनिया यांनी कल्पना दिली होती. धुनीया हा सध्या कुवेत या ठिकाणी असल्याची माहिती आहे.