पालघरमध्ये आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. पालघरच्या बोईसर नागझरी परिसरात आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात येत आहे. तब्बल 24 तासांपासून आयकर विभागाकडून तपास सुरू आहे.
अरुण अधिकारी, विनोद अधिकारी, रुपेश अधिकारी यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकण्यात आले असून स्टोन क्रशर आणि दगड खाणींमध्ये मोठ्या प्रमाणावर रोखीने व्यवहार होत असल्याने आयकर विभागाने छापे टाकल्याची माहिती मिळत आहे .