Gold Rate : बांगलादेशातील अराजकतेचा सुवर्णनगरीत परिणाम; सोन्याच्या दरात 1300 रुपयांनी घसरण

जळगावच्या सराफ बाजारात 1300 रुपयांनी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

जळगावच्या सराफ बाजारात 1300 रुपयांनी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. बांगलादेशातील अराजकतेचा परिणाम जळगावच्या सुवर्ण नगरीत ही पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात 1300 रुपयांची घट झाल्याने ग्राहकांनी सोनं खरेदी साठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.

अमेरिकेत मंदीची लाट येण्याची शक्यता, त्याच बरोबर इराण आणि इजरायल देशातील तणाव पूर्ण संबंध यासह शेजारच्या बांगला देशात निर्माण झालेली अराजकता याचा परिणाम जळगावच्या सुवर्ण नगरीवरही पाहायला मिळत असून, गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात 1300 रुपयांची घट झाल्याने ग्राहकांनी सोनं खरेदी साठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com