IAS Pooja Khedkar यांचा आणखी एक प्रताप समोर, दिव्यांग असल्याचे सांगून UPSC परीक्षेत मिळवली सूट
IAS पूजा खेडकरचा आणखी एक प्रताप समोर आलेला आहे. पूजा खेडकर दिव्यांग असल्याचे सांगून UPSC परीक्षेत सूट मिळवल्याचं कळालं आहे. खेडकरने दृष्टी कमी असल्याचा दावा केल्याची माहिती आहे. दिव्यांग गटातून निवड झाल्याचं शासकीय संकेतस्थळावरून कळत आहे. प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या त्यांच्या रुबाबामुळे चर्चेत आहेत. यातच आता त्यांनी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होताना दृष्टी कमी असल्याचा दावा केला होता. हा दावा वादात अडकण्याची शक्यता आहे.
प्रशिक्षणार्थी (प्रोबेशनरी) आयएएस अधिकारी पूजा खेडकर या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. अधिकाराचा गैरवापर केल्यामुळे राज्य सरकारने त्यांची बदली केली आहे. खासगी वाहनांवर लाल-निळा दिवा लावणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालनावर कब्जा मिळवल्यामुळे त्या वादात अडकल्या होत्या. त्यानंतर त्यांची वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. आता पूजा खेडकर यांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. युपीएससी परीक्षा देत असताना त्यांनी दृष्टीदोष आणि मानसिक आजार असल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले होते.