सीमाभागात आज हुतात्मा दिवस; हुतात्मा चौकात मराठी भाषिक करणार आंदोलन

सीमाभागात आज हुतात्मा दिवस पाळला जात आहे. हुतात्मा चौकात मराठी भाषिकांचं आंदोलनसुद्धा करणार आहेत.
Published by :
Team Lokshahi

सीमाभागात आज हुतात्मा दिवस पाळला जात आहे. हुतात्मा चौकात मराठी भाषिकांचं आंदोलनसुद्धा करणार आहेत. मराठी भाषिकांचं राज्य सरकारविरोधात निदर्शने करतील. बेळगाव सीमाभागातील मराठी भाषिक निदर्शने करणार आहेत. सीमाभागात 17 जानेवारी हा हुतात्मा दिवस म्हणून पाळला जातो. 65 वर्षांपासून सुरु असलेल्या सीमालढ्याच्या इतिहासात 17 जानेवारी या दिवसाला महत्व आहे. 17 जानेवारी 1956 रोजी बेळगावमध्ये सीमालढ्यासाठी आंदोलन करणाऱ्या 5 आंदोलक पोलिसांच्या गोळीबारात हुतात्मे झाले होते. त्यामुळे आजचा दिवस हा सीमाभागात हुतात्मा दिवस म्हणून पाळला जातो. आज हुतात्मा चौकात बेळगाव सीमाभागातील मराठी भाषिक हे महाराष्ट्र सरकारविरोधात निदर्शने करत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com