Sangli : कुपवाड येथे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज साठा, पुणे पोलिसांच्या तपासात समोर
पुणे पोलिसांनी केलेल्या अत्यंत वेगवान हालचालींमुळे देशभरात आणि परदेशात स्मगलिंगसाठी चाललेल 1600 किलो मेफोड्रेन पुणे पोलिसांनी तब्बल 6 वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करून जप्त केलं आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या 10 टीम्स या दौंड कुरकुंभ एमआयडीसीतील अर्थकेम कंपनीत, दिल्लीत, कराड, सांगली, बेंगलोर या भागात छापेमारी करत होत्या. शुक्रवारी एक किलो एमडी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सुरू केलेल्या तपासात अत्यंत वेगवान तपास करून मीठाची वाहतूक करतोय असं समजून ट्रान्सपोर्ट करणाऱ्या तीन टेम्पोचालकांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि ड्रग्जच आंतरराष्ट्रीय रॅकेटच पोलिसांच्या हाती लागलं आहे.
तब्बल 1600 किलो मेफोड्रेन पोलिसांनी जप्त केल आहे. ज्यात 900 किलो एमडी दिल्लीत देशांबरोबर तस्करीसाठी नेत असताना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. तर तब्बल साडेसहाशे किलो एमडी हे कुरकुंभच्या एमआयडीसीतील अर्थकेम या कंपनीतून साडेसहाशे किलो जप्त करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत साधारण पणे एक किलोसाठी दीड कोटी रूपये इतकी असते. त्यानुसार सुमारे तीन हजार कोटी रूपयांचं एमडी पकडण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे. आजवर महाराष्ट्र पोलिसांच्या इतिहासातील आजपर्यंतची ही सगळ्यात मोठी कारवाई मानली जाते आहे. आतापर्यंत या प्रकरणात पुण्यातून हैदर शेख आणि वैभव माने नावाच्या आरोपी सह आणखी एक जन तर दिल्लीतून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात परदेशी नागरिक असलेल्या दोन जणांचा शोध सुरू आहे.