गावात बस थांबत नसल्याने शाळेत जायचे कसे; विद्यार्थ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

यवतमाळमध्ये ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाची बस हाच एकमेव पर्याय आहे.
Published by :
Team Lokshahi

यवतमाळमध्ये ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाची बस हाच एकमेव पर्याय आहे. मात्र नेर तालुक्यातील सोनखास येथे बसच थांबत नसल्यानं तब्बल 40 ते 50 विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास खडतर झाला आहे. सोनखास येथे बसला थांबा द्यावा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन दिले. गावात बस थांबत नसल्याने शाळेत जायचे कसे, असा प्रश्न उपस्थित केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com