व्हिडिओ
अदानींवरील आरोप? हिंडनबर्गचा अहवाल? तरीही सरकार शांत का?
अब्जाधिश गौतम अदानी आणि अदानी समूहाची चहूबाजूला चर्चा रंगली आहे.
अब्जाधिश गौतम अदानी आणि अदानी समूहाची चहूबाजूला चर्चा रंगली आहे. मागील आठवड्यात अमेरिकेतील एक संशोधन कंपनी, हिंडेनबर्गने आपला एक खळबळजनक अहवाल प्रकाशित केला. ज्याने भारतीय शेअर बाजार आणि अदानी समूहाच्या घसरणीला कारणीभूत ठरले. या अहवालामुळे अदानी समूहातील जवळपास सर्वच शेअर्समध्ये मोठी घसरण झाली असून तर त्यांची नेटवर्थही कमी झाली.
न्यूयॉर्कस्थित हिंडनबर्ग रिसर्च या कंपनीने एका अहवालामुळे अदानी समूहाचे बाजारमूल्य अवघ्या दोन व्यापार सत्रांमध्ये ५० अब्ज डॉलरनी घसरले. परिणामी अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीतील स्थानातून खाली घसरले. 84.4 अब्ज डॉलर्सच्या वर्तमान संपत्तीसह, अदानी आता प्रतिस्पर्धी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्यापेक्षा फक्त एक स्थानावर आहे, ज्यांची एकूण संपत्ती $82.2 अब्ज आहे.