Hemant Soren : हेमंत सोरेन यांना मोठा धक्का, झारखंडमध्ये लवकरच राजकीय भूकंप?
झारखंडमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता आहे, कारण भाजपाकडून हेमंत सोरेन सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु झाल्याच समोर आलं आहे. माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन 6 आमदारांसह अज्ञात स्थळी रवाना झाल्याची माहिती सूत्रांद्वारे समोर आली आहे. हेमंत सोरेन यांचे काका चंपाई सोरेन भाजपाच्या संपर्कात असल्याची शक्यता आहे, तर चंपाई सोरेन हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. चंपाई सोरेन कोलकाता मार्गे दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
यापार्श्वभूमीवर संजय राऊत म्हणाले, वन नेशन वन इलेक्शन हा मोदींचा नारा आहे. हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीर या चार राज्यांच्या निवडणुका एकत्रच व्हायला पाहिजे, त्या त्यांनी घेतल्या नाहीत. महाराष्ट्र आणि झारखंड त्यांनी दूर ठेवल, कारण त्यांना झारखंडमध्ये गडबड करायची आहे. निवडणुकीच्या आधी सोरेन यांना हटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांचा पक्ष फोडून महाराष्ट्रात त्यांना सरकारची जी तिजोरी आहे ती रिकामी करायची आहे मतांसाठी म्हणून या दोन राज्यांच्या निवडणुका त्यांनी पुढे ढकल्या आहेत.