व्हिडिओ
Dhamani Dam : धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडले, नदीकाठी सतर्कतेचा इशारा
पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास या दोन्ही धरणातील पाणीसाठा पूर्ण झाला
पालघर: जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास या दोन्ही धरणातील पाणीसाठा पूर्ण झाला आहे. धामणी धरणातून पालघर जिल्ह्यातील प्रमुख शहरांसह वसई, विरार आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकांना पाणीपुरवठा होतो. त्याच प्रमाणे, सूर्या प्रकल्पाच्या उजवा आणि डावा कालव्याच्या मार्फत शेतकऱ्यांना शेतीसाठीही पाणीपुरवठा करण्यात येतो.
मागील आठवडाभरापासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे कवडास धरण ओवर फ्लो झाले आहे. म्हणून धामणी धरणाचे पाचही दरवाजे 50 सेमी ने उघडण्यात आले आहेत . धामणी धरणातून आठ हजार क्युसेक तर धामणी आणि कवडास मिळून 18000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत सुरू आहे. त्यामुळे सूर्य नदीला मोठा पूर आला असून नदीकाठावरील 64 पेक्षा अधिक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे .