व्हिडिओ
कोर्टाने हसन मुश्रीफ यांचे सीए महेश गुरवांचा जामीन अर्ज फेटाळला
कोल्हापुरातील संताजी घोरपडे साखर कारखाना मनी लाँड्रिंगप्रकरणी हसन मुश्रीफ यांचे सीए महेश गुरव यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
कोल्हापुरातील संताजी घोरपडे साखर कारखाना मनी लाँड्रिंगप्रकरणी हसन मुश्रीफ यांचे सीए महेश गुरव यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. गुरव यांना हसन मुश्रीफ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या गुन्हेगारी कारवायांतून मिळाल्या पैश्याची पूर्ण कल्पना होती असं कोर्टानं निरीक्षण नोंदवलं आहे.
शेतकऱ्यांकडून गोळा करण्यात आलेल्या पैश्यांची देखील सीए तसेच ऑडिटर असलेल्या गुरव यांना कल्पना होती असंही कोर्ट म्हणालं आहे. मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी कट रचून शेतकऱ्याकडून पैसे घेतले आणि त्यांची फसवणुक केल्याचे कोर्टानं निरीक्षण नोंदवलं आहे. या प्रकरणी एप्रिल महिन्यात मुश्रीफ यांचा देखील जामीन अर्ज फेटाळला असून त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावरच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.