व्हिडिओ
Jalna Lathi Charge : जालन्यातील प्रकरणावर सरकारकडून कारवाईला सुरुवात; एसपी तुषार दोषी सक्तीच्या रजेवर
जालन्यातील घटनेनंतर तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता त्यांच्या जागेवर शैलेश बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जालन्यातील घटनेनंतर तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता त्यांच्या जागेवर शैलेश बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्याच्या गृहमंत्रालयाने तातडीने पावलं उचलायला सुरूवात केली असून शैलेश बलकवडे यांची जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शैलेश बलकवडे यांनीही जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. जालना जिल्ह्यात घडलेल्या घटनेचा आढावा आता नवीन एसपी शैलेश बलकवडे घेत असल्याची माहिती आहे.