व्हिडिओ
Job Alert : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठीआनंदाची बातमी; महाराष्ट्रात ११ हजार पदांची भरती
तीन वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील आरोग्य विभागातील भरतीला वेग येणार आहे. आज 11 हजार पदांसाठी जाहिरात येणार आहे.
तीन वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील आरोग्य विभागातील भरतीला वेग येणार आहे. आज 11 हजार पदांसाठी जाहिरात येणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. क आणि ड श्रेणीतील 10949 जागांसाठी ही जाहिरात निघतेय. आरोग्य सेवकांच्या क आणि ड वर्गासाठी होणारी ही भरती एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत केली जाणार आहे. ’क’ वर्गातील 55 प्रकारची विविध पदे, तसेच ‘ड’ वर्गातील 5 प्रकारची विविध पदे भरली जाणार आहेत, अशी एकूण 10 हजार 949 पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. गट क' संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे.