व्हिडिओ
Ganesh Murti : कोकणात गणेश मूर्तिकारांची लगबग ; लहान मूर्त्या बनवायला सुरुवात
कोकणात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे आता गणेश मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे.
कोकणातील गणेशोत्सव कुटुंबाला बांधणारा, रक्ताची नाती जवळ आणणारा, उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण करणारा आहे. पाहुणे, मुलांची धम्माल, जुन्या-नव्या पिढीसोबत गप्पा, नाच-गाण्यांच्या कार्यक्रमांची जागरणं, सासर-माहेरची माणसं एकत्र येणं असा हा ऊर्जावर्धक सण आहे.
कोकणात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे आता गणेश मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. कोकणात प्रामुख्याने शाडूच्या मातीच्या मुर्तीला जास्त पसंती दिली जाते. आता लहान मूर्त्या बनवायला सुरु झाल्या असून सार्वजनिक मंडळाच्या पाच ते आठ फूटापर्यंत मूर्त्या बनवल्या जात आहेत. त्यामुळे कोकणात सर्व गणेश कारखान्यात मूर्तिकारांची लगभब सुरु झाली आहे.