Foxconn Company : फॉक्सकॉन इंडियाचा विवाहित महिलांना नोकऱ्या न देण्याचा निर्णय

विवाहित महिलांना नोकरी देण्यास कंपनीचा नकार आहे.
Published by :
Dhanshree Shintre

अ‍ॅपलसाठी उत्पादने बनविणारी कंपनी फॉक्सकॉन इंडियाने तामिळनाडूतील पेरुंबुदूर येथील आपल्या आयफोन जुळणी प्रकल्पात विवाहित महिलांना नोकऱ्या न देण्याचा निर्णय घेतला असून, त्यावरून प्रचंड वाद निर्माण झाला आहे.

याप्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. आयोगाने म्हटले की, माध्यमांत आलेल्या बातम्या खऱ्या असतील, तर विवाहित महिलांबाबत नोकरीच्या मुद्यांवर भेदभाव करणे अत्यंत गंभीर आहे. समानता आणि समान संधीच्या अधिकाराचे हे उल्लंघन आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com