व्हिडिओ
मुख्यमंत्री शिंदेंचा अर्ज भरायला चार पिढ्या, वडिलांसह नातूही उपस्थित
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कोपरी पाचपाखडी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला, यावेळी त्यांचे चार पिढ्या उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंचा अर्ज भरायला त्यांच्या चार पिढ्या उपस्थित होत्या. त्यांचे वडिल संभाजी शिंदे, त्यांचा मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश हेदेखील उपस्थित होते. तसच त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे आणि सून सौ. वृषाली शिंदे याही उपस्थित होत्या.