Maharashtra News : पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी आता मराठवाड्याला

कोल्हापूर, सांगली भागातील पूर व्यवस्थापन करणे आणि पावसाळ्यात ते पाणी दुष्काळी मराठवाड्यात देणे, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला वित्तसाह्य करण्यास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे.
Published by :
Team Lokshahi

कोल्हापूर, सांगली भागातील पूर व्यवस्थापन करणे आणि पावसाळ्यात ते पाणी दुष्काळी मराठवाड्यात देणे, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला वित्तसाह्य करण्यास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. या प्रकल्पात जागतिक बँक 2328 कोटी रुपये, तर राज्य सरकार 998 कोटी रुपये असे योगदान असेल. महाराष्ट्रात एकीकडे तीव्र दुष्काळ, तर दुसरीकडे अतिवृष्टी अशी परिस्थिती निर्माण होते. हवामान बदलाबाबत व्यापक दृष्टिकोनातून विचार करण्याची हीच वेळ आहे. अनेक जागतिक संस्थांच्या गाठीशी आपत्ती व्यवस्थापनाचा उत्तम अनुभव असतो. अशावेळी पुराच्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवून एकाच वेळी दोन्ही क्षेत्रांना आपण दिलासा देऊ शकतो, अशी भूमिका उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सातत्याने मांडली होती. त्यातून महाराष्ट्र वातावरणपूरक विकास कार्यक्रमाची आखणी झाली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com