Hingoli: दुष्काळी स्थितीमुळे हिंगोलीतील शेतकरी हतबल

हिंगोलीतील शेतकऱ्यांनी अवयव विक्रीला काढल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता हिंगोलीच्या तपोवन गावातील शेतकऱ्यांनी रक्त विक्रीला काढल्याची घटना समोर आली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

हिंगोलीतील शेतकऱ्यांनी अवयव विक्रीला काढल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता हिंगोलीच्या तपोवन गावातील शेतकऱ्यांनी रक्त विक्रीला काढल्याची घटना समोर आली आहे. दुष्काळी स्थितीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी थेट आपलं रक्तच विक्रीला काढलं आहे. आमचं रक्त विकत घ्या, पण अन्नधान्य द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून सततची दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने कापूस, तूर, सोयाबीन पिके उध्वस्त झाली आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान होऊनही पीक विमा मिळाला नसल्याने हिंगोलीच्या तपोवन येथील शेतकऱ्यांनी स्वतःचं रक्त विक्रीला काढल आहे आमचे रक्त घ्या पण आम्हाला खायला अन्नधान्य दया अशा प्रकारचे स्वतःला पोस्टर लावले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com