व्हिडिओ
Ravikant Tupkar | शेतकरी नेते रविकांत तुपकरांना जामीन मंजूर
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना जामीन मंजूर झाला आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना जामीन मंजूर झाला आहे. बुलढाणा कोर्टाकडून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी तुपकरांना ताब्यात घेतलं होतं. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. रेल रोकोदेखील करण्याचा इशारा दिला होता.
न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर तुपकर यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. 'मला झालेली अटक ही बेकायदेशीर आहे. सरकारने कितीही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही थांबणार नाही', असा इशारा देखील तुपकर यांनी दिली आहे.