World Recession : जग पाचव्यांदा आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर, जागतिक बँकेच्या इशाऱ्यात काय?
पेट्रोल-डिझेलसह सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती आभाळाला भिडल्या आहेत. श्रीलंकेत आणीबाणी जाहीर झाली आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोल 230 रुपये लिटरने विकले जात आहे. रशिया-युक्रेनमध्ये युद्ध संपत नाही. गेल्या दशकातील सर्वाधिक महागाईचा दर सध्या आहे. कर्ज महाग होत आहे. या सर्व प्रकारामुळे पुन्हा जगात आर्थिक मंदी येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
अर्थव्यवस्थेचा विकास थांबून जातो. रोजगार कमी होत जातो. महागाई वाढत जाते आणि लोकांचे उत्पन्न कमी होत जाते, हे सर्व प्रकार म्हणजे जगात आर्थिक संकट येणार असल्याचे चाहूल आहे. यापुर्वी 1975, 1982, 1991 आणि 2008 मध्ये जगाने आर्थिक संकट पाहिले आहे. आता 2022 मध्ये पुन्हा हे संकट येण्याची शक्यता जागतिक बँकेने व्यक्त केली आहे. गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांनी कर्मचारी भरतीत कपात केली आहे.
कोरोनाचे संकट, रशिया-युक्रेन युद्ध, दशकातील सर्वाधिक महागाई दर, महाग होत जाणारे कर्ज ही मंदीच्या संकेताची मुख्य कारणे आहेत. अमेरिकेत गेल्या 40 वर्षातील सर्वाधिक 9.1 टक्के महागाई दर आहे. युरोपियन युनियन महागाई दर 7.6 टक्क्यांवर पोहचला आहे. आतापर्यंत 20 कोटी बेरोजगार होण्याचा अंदाज आहे. भारताचा महागाई दर 7.1 टक्के आहे. रुपया डॉलरच्या तुलनेत 80 पर्यंत घसरला आहे. व्यापारातील तूट वाढत आहे. यामुळे भारतासमोर मंदीचे संकट असणार आहे. मंदी आल्यास एक ते दोन वर्ष असेल, असे आर्थिक क्षेत्रातील जानकार सांगतात.
भारताचे विदेशी कर्ज वाढत आहे. विदेशी चलनाचा साठा कमी होत आहे. यामुळे महागाई वाढली आहे. देशातील सर्वसामान्य महागाईने बेजार झाला आहे. त्याचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडत चालले आहे आणि जागतिक मंदी आली आली तर सर्वसामान्यांची अवस्था अधिक बिकट होणार आहे. मंदीचे संकट येऊ नये, यासाठीच आता प्रयत्न करायला हवे.