Eknath Shinde: निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार; कारण काय ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गुवाहाटी दौऱ्यावर जाणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. कामाख्या देवीचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करणार असल्याची देखील माहिती मिळाली आहे.
Published by :
Team Lokshahi

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गुवाहाटी दौऱ्यावर जाणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. कामाख्या देवीचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करणार असल्याची देखील माहिती मिळाली आहे. कामाख्या देवीचं दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडणार असल्याचं समोर आलं आहे. शिवसेनेत ज्यावेळेस बंड झालेलं होत तेव्हा सुरुवातीला सगळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात ज्यांनी ज्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती.

हे सगळे शिवसेनेचे नेते पदाधिकारी हे कामाख्या देवीच्या दर्शनाकरता गुवाहाटीला गेले होते. गुवाहाटी वाया महाराष्ट्र असा सत्ता संघर्षाचा प्रवास होता आणि त्याच दृष्टीकोनातून पुन्हा एकदा ज्यावेळी विधानसभा निवडणुका आल्या त्यासाठी कामाख्या देवीचे दर्शन घेण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला जाणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com