Sanjay Raut : राहुल गांधींवर ईडीची कारवाई? संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले...
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर ईडीची कारवाई होण्याची शक्यता आहे. ईडीची कारवाई होण्याचा दावा खुद्द राहुल गांधी यांनी सोशल मीडियवरुन केला आहे. ईडी कारवाईची शक्यता असल्याची पोस्ट राहुल गांधींनी शेअर केली आहे. तर चक्रव्यूहवालं भाषण आवडलं नसल्याने कारवाईची शक्यता असल्याची राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
2 दिवसांपूर्वी राहुल गांधींनी भाजपाकडून कशा पद्धतीने भारताच्या तरुणाच्या अवतीभोवती चक्रव्यूह रचला जात आहे असा हल्लाबोल केला होता आणि ते भाषण सत्ताधाऱ्यांना आवडलं नाही आणि त्यामुळे ईडी कारवाईचं प्लॅनिंग केलं जात असल्याची माहिती आपल्याला ईडी मधल्या काही लोकांनी दिली असल्याचा दावा राहुल गांधी यांनी सोशल मीडियवर केला आहे.
राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत. ज्या पद्धतीने गेल्या एक महिन्यापासून ते सरकारवरती हल्ला करत आहेत. सरकारला आरसा दाखवत आहेत. मोदी आणि शाहांना सळो की पळो करुन सोडतायेत. त्याच्यामध्ये राहुल गांधी असतील आम्ही सगळे असू आम्हाला पुन्हा एकदा कारवाईला सामोरे जावे लागेल. आमची तयारी आहे. पण त्यांना आता ईतकं सोपं नाहीये. विरोधी पक्ष खूप मजबूत आहे. आम्ही पाहू पण जरी तुमचे बहुमत गमावलंय तुम्ही अल्पमतात जरी आले असता तरी केंद्रीय यंत्रणाचं गैरवापर घटनाबाह्य कामं करण्याची आपलं व्यसन काही सुटत नाही असे संजय राऊत म्हणाले.